Beed News: माजलगाव तेलगाव मार्गावर पडक्या घरात वयोवृद्धाचा कुजलेला मृतदेह; दोन विषाच्या बाटल्या अन्...
Majalgaon : माजलगाव तालुक्यातील नित्रुडजवळ एका पडक्या घरातून एका वृद्ध व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून परिसरात खळबळ उडाली आहे. दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृताची ओळख पटवली असून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.