

Majalgaon Police Action
sakal
माजलगाव (जि. बीड) : तालुक्यातील कवडगावथडी येथे इतर जिल्ह्यातील तीस ऊसतोड मजुरांना डांबून ठेवत जबरदस्तीने वेठबिगारीचे काम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनंतर तातडीने कारवाई करत संबंधित मजुरांची सुटका शुक्रवारी (ता. १४) करण्यात आली.