Amol Birajdar and DCM Eknath Shinde
sakal
लोहारा (जि. धाराशिव) - लोहारा तालुक्यातील राजकीय वर्तुळात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी आपल्या समर्थकांसह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई येथे मंगळवारी (ता. २०) दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. आगामी लोहारा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षांतरामुळे तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे.