Beed Police Transfers : पोलिस दलात खांदेपालट; अधिकाऱ्यांच्या बदल्या, वादग्रस्त महाजन व पाटील यांचीही बदली
Beed Police Officer Postings : बीड जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन आणि उपनिरीक्षक राजेश पाटील यांचीही बदली जिल्ह्याबाहेर करण्यात आली आहे.
बीड : कालावधी पूर्ण झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अधिकाऱ्यांच्या बाहेर जिल्ह्यात बदल्या झाल्या असून, बाहेर जिल्ह्यातून देखील अधिकारी बदलीने येणार आहेत.