
Jintur Crime
sakal
जिंतूर (जि. परभणी) : स्थानिक पोलिस ठाण्याच्या पथकाने रविवारी (ता. २१) पहाटे चारच्या सुमारास जिंतूर-औंढा रोडवरील गिते नर्सरीजवळील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगारावर व दारू बाजारावर छापा मारला. या कारवाईत तब्बल ३६ लाख ४५ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १९ संशयितांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.