Umarga News : धाराशिव जिल्ह्यातील ३.५७ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! उर्वरित २२७ कोटी रुपयांचा पीकविमा मिळणार; माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या न्यायालयीन लढ्याला यश

सन २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला.
Dnyanraj Chaugule

Dnyanraj Chaugule

sakal

Updated on: 

​उमरगा, (जि. धाराशिव) - सन २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाच्या अंतिम निकालात उर्वरित २२७ कोटी रुपयांची पीकविमा रक्कम वितरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ५७ हजार २८२ शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सुमारे नऊ हजार रुपये मिळणार असून, येत्या आठवडाभरात ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार असल्याची माहिती माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली.

Loading content, please wait...