
उदगीर, (जि.लातुर) : महसूल विभागातील बहु चर्चित व दहा दहा वर्षे ठाण मांडून बसलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांची महसूल विभागाने दखल घेत बदल्या केल्या आहेत उदगीर तालुक्यातील सतरा तलाठी व चार मंडळ अधिकाऱ्यांना तालुक्या बाहेर बदली करण्यात आली आहे तर बाहेरून उदगीरला वीस तलाठी व दोन मंडळाधिकारी यांची नियुक्ती केल्याचे बदली आदेश जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने लातुरचे निवासी उपजिल्हाधिकारी केशव नटवे यांनी गुरुवारी (ता.२९) रोजी सायंकाळी काढले आहेत.