Beed News : विद्यार्थी खरेदी-विक्रीतून बोगस संचमान्येचा महाघोटाळा; चंपावती विद्यालयात आढळले उत्तराखंडचे ३ बोगस विद्यार्थी

​ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये यू-डायसवर बनावट प्रवेश दाखवून पदभरतीचा बनाव; शिक्षणाधिकाऱ्यांच्या धाडीत पितळ उघडे.
Admission

Admission

sakal

Updated on: 

- नितीन चव्हाण

बीड - बीड जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थांमध्ये पटसंख्या फुगवून, बोगस संचमान्यता पदरात पाडून घेण्यासाठी आणि शिक्षकांची पदे वाचवण्यासाठी विद्यार्थी खरेदी-विक्रीचा धक्कादायक महाघोटाळा उघडकीस आला आहे. बीड येथील चंपावती विद्यालयात प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी शुक्रवारी प्रत्येक्ष भेट देऊन केलेल्या चौकशीत उत्तराखंडमधील यू-डायसवर नोंद असलेल्या तीन विद्यार्थ्यांचे बनावट प्रवेश दाखवल्याचे निष्पन्न झाले आहे. या गंभीर गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी थेट पुणे शिक्षण आयुक्तांकडे सादर केल्याने जिल्ह्यातील बोगस संस्थाचालक आणि दलालांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com