Pankaja Munde: .. अन्यथा मी राजीनामा देणार; पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे झाले भावुक, दोन्ही नेत्यांच्या डोळ्यात अश्रू

Beed loksabha Election: माझ्या गळ्याची शपथ, महाराजांची शपथ आहे. प्लिज पंकजा ताईंना निवडून द्या, असं आवाहन उदयनराजे यांनी केलं.
Pankaja Munde Udayanraje
Pankaja Munde Udayanraje

बीड- भाजप नेते उदयनराजे भोसले हे बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी व्यासपीठावरुन बोलताना उदयनराजे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, पंकजा मुंडे या देखील भावुक झाल्या. पंकजा मुंडेंना खासदार करा अन्यथा मी राजीनामा देईन अन् त्यांना साताऱ्यातून निवडून आणेन, असं वक्तव्य उदयनराजे यांनी यावेळी केलं आहे.

बोलताना उदयनराजे यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले की, बीडकरांनी पंकजा यांना खासदार करावं, अन्यथा ते राजीनामा देतील आणि पंकजा यांना साताऱ्यामधून निवडून आणेन. मग तुमच्याकडे मी पाहून घेतो, अशी गमतीत धमकी त्यांनी यावेळी दिली.

Pankaja Munde Udayanraje
Beed Lok Sabha Election: बीड लोकसभा निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण निर्णायक; कोण जाणार दिल्लीत?

आता पेंगा पण मतदानाच्या दिवशी पेंगू नका. नाहीतर मी तुम्हाला छळायला येणारच अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. यावेळी उदयनराजे यांनी कॉलर देखील उडवली. ही प्रचारसभा नव्हती, विजयसभा होती. पंकजा काही वेगळ्या नाहीत. माझे वडील वारल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी माझं बोट धरलं. मला आधार दिला. माझ्या गळ्याची शपथ, महाराजांची शपथ आहे. प्लिज पंकजा ताईंना निवडून द्या, असं आवाहन उदयनराजे यांनी केलं.

Pankaja Munde Udayanraje
Ravindra Waikar: "जेल किंवा पक्षबदल, माझ्याकडे दोनच पर्याय होते," लोकसभा लढवणाऱ्या शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक खुलासा

अजित पवार पंकजा मुंडे यांच्याबाबत काय म्हणाले?

पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे शिफारस करणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. माझी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत चांगली ओळख झाली आहे. त्यामुळे पंकजा खासदार झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी शिफारस करेन, असं अजित पवार म्हणाले आहेत.

भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी त्यांचे बंधु धनंजय मुंडे यांनी देखील चांगला जोर लावला आहे. दुसरीकडे, पंकजा मुंडे यांच्यासमोर बजरंग सोनवणे यांचे आव्हान असणार आहे. सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com