Video- माळेगाव यात्रेत ‘हे’ प्राणी वेधत आहेत लक्ष...

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : पशु व अश्व प्रदर्शनासाठी दक्षीण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेमध्ये यंदा राज्यासह देशभरातून सिंधी, काटेवाड, मारवाड, पंजाब, लुकरा या प्रजातींचे अश्व प्रदर्शनासह खरेदी, विक्रीसाठी दाखल झाले आहेत. रेस, चाल आणि सवारीसाठी अश्वांच्या विशिष्ट प्रजातींची निवड करण्यात येते.

परंपरेनुसार केवळ प्रदर्शनासाठी हौसेने माळेगाव यात्रामध्ये येत असल्याच्या भावना अंबेजोगाई (जि. बीड), बिलोली (जि. नांदेड) येथील अश्वमालकांनी व्यक्त केल्या. पशुप्रदर्शनासह अश्व, उंट, खेचर बाजारासाठी प्रसिद्ध माळेगाव यात्रास्थळावर राज्यासह परप्रांतातून देखणे अश्व, उंट दाखल झाले आहेत. 

अश्व यात्रेचे मुख्य आकर्षण 

परंपरेनुसार सारंगखेडा यात्रेचा बुधवारी (ता. २५) समारोप होत असल्याने अश्वपालक वाहनाद्वारे माळेगाव यात्रेकडे रवाना झाले आहेत. राज्यासह परप्रांतातील देखणे, मौलिक अश्व प्रदर्शनासाठी यात्रास्थळावर दाखल झाले आहेत. राजकीय नेत्यांच्या अश्वासह इतर हौशी अश्वपालकांची अश्व यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. विविध प्रजातींच्या अश्वांच्या चालींची अश्वप्रेमींना भुरळ पडत आहे. खरेदी - विक्रीसाठी वाजत गाजत सवारीद्वारे अश्वाच्या चालींची चाचपणी केली जाते. यात्रास्थळावर सिंधी, काटेवाड, मारवाड, पंजाब, लुकरा या प्रजातींच्या अश्वांची त्यांच्या रंगानुसार किंमत ठरते.

सिंध प्रजातीच्या अश्वाला मागणी


अश्वांच्या विविध प्रजातींपैकी एक सिंध प्रजातीचे अश्व रेससाठी प्रसिद्ध आहे. भडक रंग, बांध्याची ठेवण या अश्वाची खास वैशिष्ट आहेत. दरम्यान, अश्वप्रेमींकडून सिंध प्रजातीच्या शुभ्र अश्वास मागणी असते. मात्र, कोणत्याही एका रंगावर इतर रंगाचा किंचीत डाग त्या अश्वाच्या मोलास बाधक ठरतो. विशेष म्हणजे इतर अश्वाच्या तुलनेत सिंध अश्वाचा खुराक जवळपास समान असतो.  

हौसेला मोल नाही  


महागड्या दुचाकीपासून लक्झरी कारच्या तुलनेत आजही अश्व सवारी तेवढीच मोहक अाणि मौलिक असते. अश्वाचा एका दिवसाचा खुराक दोन ते तीन किलो हरभरा, वाळलेला चारा, आवडीचा खुराक महागाईच्या तुलनेत मोठा खर्चिक आहे. इतर पशुंच्या तुलनेत एका अश्वास तीन पशुंचा वाळलेला खुराक सोबत हरभरा, पेंड आदी त्यामुळे अश्वपालन केवळ हौशी मालकाचे काम असल्याचे येथील अश्वमालक सांगतात. 

अश्वाची खास वैशिष्ट्ये 


कायम उभाराहून खुराक घेणाऱ्या विविध प्रजातींचे अश्व उभे राहूनच झोप घेतात. एका पायाची घडी घालून तीन पायावर उभा राहिला म्हणजे अश्व झोपेत आहे. विशेष म्हणजे झोपेत पाय बदलून घडी घालणे, हे प्रत्येक अश्वाचे खास वैशिष्ट्य असल्याचे अश्व मालक सारंग पाटील (ता. बिलोली) यांनी सांगितले. साधारण ४० ते ४५ किलोमीटर तासी रेसच्या अश्वाचा वेग असतो. तसा रेस साठी अश्वाची अगोदर सराव महत्वाचा असतो. एकदम वीस किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची रेस तर धोका असतोच पण धावत्या अश्वाला जागेवर थांबवणे त्याही पेक्षा मोठा धोका असतो.   

अश्वप्रेमींची इच्छापूर्ती


माळेगाव यात्रेमध्ये विविध प्रजातींचे अश्व अश्वप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहेत. देखण्या अश्वांना न्याहाळत त्याबद्दलची माहिती अश्वमालकांकडून मिळत असल्याने अश्वप्रेमींचे शंका, समाधान होत आहे. 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhokardan Theft
The decision is expected to make travel easier and safer for thousands of pilgrims travelling to and from Pandharpur.
The protesters demanded an impartial inquiry into the alleged incidents, action on examination irregularities and accountability from the Union Education Minister.
The incident also caused damage to a soybean crop, while the exact cause of the fire will be determined after a technical inspection.
Marathi News Esakal
www.esakal.com