

Book Bank Inaugurated at ZP Primary School in Mamdapur Through Public Participation
Sakal
रामेश्वर अमृते
गंगापूर : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची कवाडे उघडी व्हावीत या उद्देशाने तालुक्यातील ममदापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या बुक बँकचे उद्घाटन मंगळवारी (ता. २९) उत्साहात पार पडले. केंद्रप्रमुख अजित तांबे आणि सरपंच उषा रणपिसे यांच्या हस्ते या बुक बँकेचे लोकार्पण करण्यात आले.