esakal | जालन्यात जलसमाधीला निघालेल्या आंदोलकाला पोलिसांनी घेतले ताब्यात|Jalna News
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस

जालन्यात जलसमाधीला निघालेल्या आंदोलकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

sakal_logo
By
दिलीप पवार

अंकुशनगर (जि.जालना) : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शहागड येथील उड्डाण पुलावरून गोदावरी नदी (Godavari River) पात्रात उडी घेऊन जलसमाधी आंदोलन करण्यासाठी निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना गोंदी पोलिसांनी बुधवारी (ता.29) सकाळी ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणसाठी बलिदान (Jalna) देणाऱ्या कुटुंबियांना मदत करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. प्रत्येक कुटुंबाला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी आणि दहा लाख रुपये देण्याचे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, ही मदत न मिळाल्याने मराठा आंदोलक जरांगे यांनी बुधवारी शहागड येथील उड्डाण पुलावरून गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

हेही वाचा: खाम नदीत वाळूज एमआयडीसीतील कामगार दुचाकीसह गेला वाहून,शोध सुरु

त्यानुसार पोलिसांनी आंदोलक मनोज जरांगे यांना जलसमाधी आंदोलनासाठी जात असताना शहागाड येथील उड्डाण पुलाजवळ बुधवारी (ता.29) सकाळी ताब्यात घेतले. यावेळी गोंदी तहसीलदार विद्याचरण कडवकर, गोंदी ठाण्याचे पोलिस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ, पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

loading image
go to top