esakal | स्कॉर्पिओ खरेदीसाठी म्हणाले ओएलएक्स करो, पैसे भरले आणि लक्षात आलं...

बोलून बातमी शोधा

Nanded News
स्कॉर्पिओ खरेदीसाठी म्हणाले ओएलएक्स करो, पैसे भरले आणि लक्षात आलं...
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : स्कॉर्पिओ गाडीची ओएलएक्सवरून विक्रीची जाहिरात करणाऱ्यांनी एकास सव्वा लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात दोघांवर गुरूवारी (ता. २७) विश्‍वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहराच्या पूर्णा रोड रस्‍त्यावर असलेल्या बजाज रेसीडेन्सी येथे राहणारे संतोष नानु गायकर (वय ३२) यांनी ओएलएक्सवर स्कॉर्पिओ (एमएच०४-डीडब्लु-४९४१) विक्रीची जाहिरात पाहिली. यावरून त्यांनी ओएलएक्सचे विकास पटेल याच्याशी आॅनलाईन संपर्क साधला. यावेळी ही गाडी कमी किंमतीत विकायची आहे असे श्री. पाटील याने त्यांना सांगितले. 

टप्प्याटप्याने एक लाख २० हजार भरले 

तुम्हाला ही गाडी पाहिजे असेल तर सर्वात अगोदर तीची नोंद करण्यासाठी १० हजार रुपये जमा करण्याचे सांगितले. यावरून त्याने पैसे गुगल पेवरून भरले. त्यानंतर पुन्हा टॅक्स २० हजार अगोदर भरावा लागतो. तेही पैसे त्याने भरले.

मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...

असे टप्प्याटप्याने एक लाख २० हजार रुपये भरल्यानंतर ओएलएक्सवरून पुन्हा- पुन्हा पैशाची मागणी करु लागले. हा व्यवहार ता. १५ फेब्रुवारी ते ता. २० फेब्रुवारीच्या दरम्यान बजाज रेसीडेन्सी येथे घडला. 

भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा 

आपली गाडी नको मला माझे पैसे परत द्या, अशी मागणी श्री. गायकर यांनी केली. मात्र पैसे देण्यास त्यांनी नकार दिला. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच श्री. गायकर यांनी भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार त्यांनी पोलिस निरीक्षक अनिरूद्ध काकडे यांना सांगितला. संतोष गायकर यांच्या फिर्यादीवरुन आकाश पटेल आणि त्याच्या साथिदाराविरुद्ध विश्‍वासघाताचा गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार राजाभाऊ जाधव करत आहेत.

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...