gutkha seized by udgir policesakal
मराठवाडा
Udgir Crime : गुटखा व पान मसाल्यासह एक जण ताब्यात; बारा लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
उदगीर ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला सुगंधित गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
उदगीर, (जि. लातुर) - उदगीर ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला सुगंधित गुटखा व पानमसाल्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली असून एकूण १२ लाख ६१ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
