esakal | रूग्णवाहिकेच्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू; केज तालुक्यातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

kej

रूग्णवाहिकेच्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू; केज तालुक्यातील घटना

sakal_logo
By
रामदास साबळे

केज (बीड): शौचास जाणाऱ्या तरूणास पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या खाजगी रूग्णवाहिकेने जोराची धडक दिल्याने तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.०२) सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास केज-अंबाजोगाई रस्त्यावर होळ पासून साधारणपणे एक किमी अंतरावर घडली. अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव संतोष रामभाऊ मुजमुले (वय-२६) असे आहे.

धारूर तालुक्यातील कारी येथील संतोष मुजमुले हा दिवसांपूर्वी आपल्या मावशीकडे नातेवाइकांना भेटण्यासाठी होळ येथे आला होता. तो गुरूवारी सकाळी होळेश्वर विद्यालयापासून काही अंतरावर केज-अंबाजोगाई रस्त्यावरून शौचास जात असताना अंबाजोगाई शहराच्या दिशेने जाणाऱ्या पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या खाजगी रूग्णवाहिका (एपी-२७/डब्ल्यू-५०८८) हिने जोराची धडक दिली. या अपघातात संतोष मुजमुले या तरूणाचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा: जिल्हा परिषदेतील शाखा अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

रूग्णवाहिका वेगात असल्याने अपघात होताच रूग्णवाहिका रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. रूग्णवाहिका चालक मात्र घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस जमादार रामधन डोईफोडे व पोलिस शिपाई नानासाहेब धुमाळ यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा करून मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संतोष मुजमुले याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.

loading image
go to top