
धाराशिव : आरोग्य विभागात नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका तरुणाची आठ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंकुश देशमुख (रा. नरखेड, ता. मोहोळ, जि. सोलापूर), संजय यमाजी साळवे (रा. मुंबई) अशी फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.