Mango Season : यंदा मराठवाड्यात लवकर पिकणार आंबा ; फेब्रुवारीतच मोहरल्या आमराया, ‘केशर’कडून उत्पादकांच्या उंचावल्या अपेक्षा

दरवर्षी साधारणतः एप्रिलमध्ये मराठवाड्यातील केशर आंबा बाजारात येतो. त्याचवेळी गुजरातमधील केशर आंबा येतो. यामुळे आपल्याकडील केशरचे भाव कमी होतात
Mango Season
Mango Seasonsakal

छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी साधारणतः एप्रिलमध्ये मराठवाड्यातील केशर आंबा बाजारात येतो. त्याचवेळी गुजरातमधील केशर आंबा येतो. यामुळे आपल्याकडील केशरचे भाव कमी होतात. मात्र, यंदा केशर आंब्याला लवकर मोहर आल्याने केशर आंबा काढणीला आणि खवय्यांना नेहमीपेक्षा लवकर चाखायला मिळण्याची शक्यता वाढली आहे. यंदा लवकर मोहोर आल्याने मार्चच्या अखेरीलाच काही भागांत केशर आंबा काढण्यासाठी येणार आहे. त्यामुळे चांगला भाव मिळेल, याची अपेक्षा आंबा उत्पादकांनी व्यक्त केली.

Mango Season
Beed News : वीटभट्टी क्लस्टरमुळे लाखोंचा होणार फायदा ; परळीत राखेच्या तुटवड्याचा प्रश्न कायम

राज्यात कोकण वगळता केशर आंब्याची ५१ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड असून, यापैकी १४ हजार हेक्टरमधील बागा फळधारणेच्या आहेत. राज्यात महाकेशर आंबा उत्पादक संघाच्या माध्यमातून अतिघन लागवडीला प्रोत्साहन दिले जात असून, सुमारे ९ ते १० हजार हेक्टर क्षेत्रात अतिघन लागवड पद्धतीने केशरच्या बागा करण्यात आल्या आहेत. डॉ. भगवानराव कापसे यांनी सांगितले, ‘‘दरवर्षी साधारणतः डिसेंबर-जानेवारीत मोहर येत असतो.

मेच्या मध्यापासून आंबे खायला मिळतात. त्याचवेळी गुजरातमधील केशरदेखील विक्रीसाठी आपल्याकडे येतो. त्यामुळे आपल्या इथे होलसेलचे भाव खाली येतात. यामुळे आंबा उत्पादकांना नुकसान सोसावे लागते. यासाठी अतिघन लागवड तंत्राने झाडांची संख्या वाढवण्यात आली. नवीन तंत्रज्ञानामुळे लवकर मोहर आला आहे. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच चांगला पाऊस झाला नंतर खंड पडला. यंदा जूनमध्येच नवती आली आणि मोहर लागला.

ऑक्टोबरमध्ये पुन्हा पाऊस झाला आणि जिथे मोहोर नव्हता, त्या फांद्यांनाही मोहर आणि फलधारणा झाली. यामुळे यंदा २० ते २५ मार्चपासून काही ठिकाणी आंबा काढणीला सुरवात होईल. आता शेतकऱ्यांनी फळगळ रोखण्यासाठी, भुरी व तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी वेळापत्रकानुसार फवारण्या कराव्या लागणार आहेत. यंदा केशर शेतकऱ्यांना भाव चांगला देईल आणि निर्यातदेखील वाढेल. यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल’’, असा विश्वास डॉ. कापसे यांनी व्यक्त केला.

Mango Season
Sambhaji Nagar Mahanagarpalika : ढोल वाजवून महापालिका करणार मालमत्ता जप्त

लवकर आंबा येण्यासाठी

डॉ. कापसे यांनी सांगितले, केशर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काढणीस यावे, यासाठी आपण महाराष्ट्रामध्ये विकसित केले आहे. यानुसार पॅकलॅब्युट्राझोल हे एक संजीवक, ज्याला कल्टार म्हणतात. हे झाडाच्या घेराची म्हणजे दुपारच्या सावलीची लांबी आणि रुंदी मीटरमध्ये मोजून त्याची सरासरी काढून प्रतिमीटरला तीन मिली कल्टार द्यावे. चार-पाच लिटर पाण्यात ते मिसळून झाडाच्या खोडाभोवती खोडापासून एक दीड फूट अंतरावर गोल कुदळीने टाचणी करून त्या छिद्रात एकेक मग्गा हे कल्टार मिश्रण टाकावे. कल्टार देण्याची वेळ ही जुलैच्या शेवटी ते पूर्ण ऑगस्टमध्ये केव्हाही देता येते. यामुळे झाडाला पन्नास ते साठ टक्के जास्त मोहर येतो.

जेवढ्या लवकर आंबा बाजारात काढणीला आणि बाजारात विक्रीला येतो तेवढा जास्त भाव थेट शेतकऱ्यांना मिळतो. दरवर्षी केशर एप्रिलमध्ये विक्रीला येत असतो. मात्र, यंदा काही भागांतील बागांमध्ये मार्चमध्येच फळकाढणी सुरू होईल आणि लवकर येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति किलो दोनशेपर्यंत भाव मिळेल.

— डॉ. भगवानराव कापसे, फळबागतज्ज्ञ

असा भाव मिळतो

  • एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंबा बाजारात आला तर प्रति किलो १७५ ते २०० रुपये भाव मिळतो.

  • दुसऱ्या आठवड्यात हा भाव कमी होऊन तो १५० रुपये किलो होतो.

  • तिसऱ्या आठवड्यात १२५ रुपये भाव मिळतो.

  • चौथ्या आठवड्यात १०० रुपये किलो भाव मिळतो.

  • १५ मे पर्यंत हा भाव कमी होऊन ६० ते ७० रुपये किलो एवढा खाली जातो.

  • २५ मे पर्यंत तर हाच भाव ४० - ५० रुपये किलो एवढा खाली जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com