

केज : उन्हाळ्यात मृतसाठ्याच्या खाली गेलेल्या मांजरा धरणाच्या वरच्या बाजूला असलेले अप्पर धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे. त्यामुळे मांजरा नदीपात्रातून धनेगाव येथील मांजरा धरणात येणाऱ्या पाण्याचा ओघ वाढला आहे.
रविवारी (ता.११) सकाळी सात वाजेच्या सुमारास मांजरा धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन ४.२० टक्के जीवंत पाणीसाठा झाल्याची माहिती मांजरा धरणाचे शाखा अभियंता सुरज निकम यांनी दिली आहे.