Manjara Dam: मांजरा धरण ९८ टक्क्यांवर; नदीकाठच्या गावांना इशारा
Latur Flood: मांजरा धरण ९८ टक्के भरल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धरणाचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
लातूर : लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात ९८ टक्के क्षमतेने भरले आहे. धरणात पाण्याचा येवा सुरु आहे. त्यामुळे धरणाचे दोन दरवाजे उघडून पाण्याचा नदीच्या पात्रात विसर्ग सुरू आहे.