Nilanga Flood : मांजरा अन् तेरणा नदीचा संगम की.. संघर्ष, उठला शेतकऱ्यांच्या जिवावर; महापूराचा कहर, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

Crop Damage : निलंगा तालुक्यात मांजरा व तेरणा नद्यांच्या संगमात पाण्याच्या संघर्षामुळे शेतीचे आणि मातीचे मोठे नुकसान झाले असून मुख्यमंत्री फडणवीस पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
Nilanga Flood

Nilanga Flood

Sakal

Updated on

राम काळगे

निलंगा : निलंगा तालुक्यामधून मांजरा व तेरणा या दोन प्रमुख नद्या वाहतात औरादशहाजानी येथील संगमावर मांजरा व तेरणा या दोन्ही नद्या एकत्र येतात त्यामुळे या ठिकाणाला 'संगम' असे म्हणतात दोन नद्यांच्या पाण्याचा प्रवाहात संघर्ष निर्माण झाला तोच संघर्ष शेतकऱ्यांच्या जीवावर बेतला आहे. मांजरा नदीचे मोठे पात्र व पाण्याचा दाब अधिक असल्यामुळे तेरणेचे पाणी आपल्या प्रवाहाच्या पात्रात घेत नाही त्यामुळे तेरणा नदी पात्राने एक किलो मीटर पेक्षा अधिक अंतर स्वतंत्र प्रवाह निर्माण केल्याने शेती पिकाचे व शेतीच्या मातीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एक प्रकारे दोन नद्यांच्या प्रवाहाच्या प्रभावामुळे पात्राचे रुपडेच पालटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com