
दिलीप दखणे
वडिगोद्री : राज्यात शैक्षणिक प्रवेश प्रकिया सुरू झाली आहे विविध शाखेत विद्यार्थी एडमिशन घेत आहे प्रवेश प्रकिया सुरू झाली असतांना देखील जात वैघता प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी वेळ लागत आहे नाशिक, पैठण, पुणे,जालना,अंबड,धाराशिव, बीड,लातुर,कन्नड, फुलंब्री, परतुर, आदी ठिकाणी जात पडताळणी करीता वेळ लागत आहे या बाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा अशी मागणी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे सोमवार ता.16 रोजी केली.