

Should Farmers Die in Bank Queues for 5 Thousand?"; Manoj Jarange's Direct Attack on Government, Said...
Sakal
जालना : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या मदतीवरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला आहे. "खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेलेल्या शेतकऱ्यांना अवघे ५ हजार रुपये देणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आणि क्रूर थट्टा करण्याचाच प्रकार आहे," असा तीव्र संताप व्यक्त करत, सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशी ठाम मागणी जरांगे यांनी केली आहे.