Manoj Jarange Hunger Strike: मनोज जरांगे यांचे आजपासून उपोषण प्रलंबित मागण्यांसाठी अंतरवालीत पुन्हा आंदोलन

Manoj Jarange Begins Hunger Strike at Antarwali Sarati; मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून उपोषण सुरू होत आहे.
Manoj Jarange Hunger Strike

Manoj Jarange Hunger Strike

esakal

Updated on

वडीगोद्री (जि. जालना): मराठा आरक्षणासंदर्भात प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे शनिवारपासून (ता. २९) उपोषण सुरू होत आहे. कुणबी प्रमाणपत्रे न मिळालेल्यांसह अन्य काही तक्रारी असलेल्यांनी अंतरवालीत यावे, असे आवाहन करून त्यांनी शुक्रवारी (ता. २८) राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com