

Manoj Jarange Protest
esakal
अंकुशनगर, वडीगोद्री (जि. जालना): ‘‘राज्यात ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या असून प्रत्येकाला सरकारने प्रमाणपत्र द्यावे, कोणालाही अडवू नये. यासह अन्य मागण्या २८ ऑगस्टपर्यंत मान्य कराव्यात; अन्यथा यापूर्वी जाहीर केल्यानुसार २९ ऑगस्टपासून उपोषण करणार असून मागे हटणार नाही,’’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर दिला.