Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या लढ्यात जरांगे आक्रमक; उपमुख्यमंत्री शिंदे-खासदार जाधवांना निवडणुकीत जागा दाखवण्याचा इशारा

Manoj Jarange Warns Eknath Shinde and Sanjay Jadhav: मनोज जरांगे यांचा शिंदे-जाधवांवर थेट निशाणा; परभणी मेळावा रद्द न केल्याची ‘मुंबईत परतफेड’ करण्याची चेतावणी
Manoj Jarange Warns Eknath Shinde and Sanjay Jadhav Over Maratha Reservation Demands During Ongoing Protest

Manoj Jarange Warns Eknath Shinde and Sanjay Jadhav Over Maratha Reservation Demands During Ongoing Protest

sakal

Updated on

जालना : मराठा आरक्षणासंदर्भात प्रलंबित मागण्या मान्य करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगे यांनी दुसऱ्या दिवशी (ता. रविवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावर टीकेची तोफ डागली. खासदार जाधव यांना आंदोलनस्थळी सर्वांसमक्ष फोन करून शिंदेंच्या उपस्थितीतील परभणीत होणारा मेळावा रद्द करा, अन्यथा तेथे येऊ, असा इशारा जरांगेंनी दिला. नंतर त्यांनी मवाळ भूमिका घेत परभणीला जाणे टाळले. शिंदे यांनीही मेळावा घेतला. मात्र, त्यानंतर जरांगे यांनी ‘याची परतफेड करणार’ असा इशारा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com