

maratha reservation
esakal
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाची परवानगी मागितली होती. मात्र बुधवारी अचानक त्यांनी अंतरवाली सराटीमध्येच उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. असं असलं तरी मुंबईचा मार्ग मात्र त्यांनी सोडलेला नाही. त्यामुळे सरकारने योग्यवेळी मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर ऐनवेळी आंदोलनाचं स्वरुप बदलू शकतं, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.