Manoj Jarange Patil
esakal
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक घोषणा करणार.
मराठा आरक्षणाबरोबरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, मदतीवर भर.
नारायणगडावरून सरकारला मोठा इशारा देणार जरांगे.
Manoj Jarange Patil Dasara Melava : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा फडणवीस सरकारला घेरण्यासाठी सज्ज झाले आहेत. आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता ते शेतकऱ्यांच्या (Farmer) प्रश्नांवर आवाज उठवणार आहेत. दसऱ्याच्या मेळाव्यात ते शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे.