
Dussehra Melava 2025: बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये त्यांनी मराठा समाजाने शासन आणि प्रशासनामध्ये टक्का वाढवण्याचं आवाहन केलं. आपण प्रशासनात गेलो तर आपले प्रश्न सुटतील, शासन आपल्या हातामध्ये असेल तर आपल्याला कुणाकडे बघण्याची गरज पडणार नाही. आरक्षण घेऊन बोगस लोक खुर्चीवर बसले आहेत, असं मोठं विधान जरांगे पाटलांनी केलं.