
Narayangad dasara melava: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या नारायणगड येथे दसरा मेळावा घेतला. हा मेळावा तब्बल ३०० एकर जागेमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. नारायणगडावर लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हजर होते. यावेळी मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासह शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुढचा लढा लढण्याची घोषणा केली आहे.