

Manoj Jarange Patil Hunger Strike Ends In Patoda Mumbai Protest Put On Hold Government Gets Three Months For Maratha Demands
sakal
बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलनाचे नेते, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण तूर्तास मागे घेतले असून मुंबई दौरा स्थगित केला आहे. सरकारला तीन महिन्यांचा अल्टिमेटम देत आहोत. या काळात सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर यापुढे उपोषण नाही, तर थेट मुंबई गाठू असा सडेतोड आणि आक्रमक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या निर्णयामुळे मराठा आंदोलनकर्ते व प्रशासनाने तूर्तास सुटकेचा निश्वास सोडला आहे.