
दिलीप दखणे ( बातमीदार)
वडिगोद्री (ता. २७) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हजारोंच्या उपस्थितीत अंतरवाली सराटी येथून आज सकाळी १० वाजता वडिगोद्री मार्गे मुंबईकडे रवाना झाले. यावेळी बोलताना जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.