
Marathwada Latest News: संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सोडविण्यासाठी शासनाने तात्काळ कार्यवाही करावी यासाठी उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांची भेट घेऊन गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी निवेदन दिले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातव्यांदा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे समाज बांधवांसमवेत अंतरवाली सराटीत येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. शनिवारी(ता २५)पासुन आमरण उपोषण सुरू आहे.