बीड - ‘मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा आरक्षणापेक्षा राजकीय अजेंडा आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांत त्यांनी हे दाखवून दिले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ते मुंबईला जाणार आहेत,’ असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. यातून दंगल घडू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.