

Maratha Reservation Protest Manoj Jarange Warns Government as Road Blocks and Bandhs Spread Across Several Maharashtra Districts
sakal
जालना : ‘‘राज्य शासनाचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर येथे बसून आमची मजा बघत आहे. त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळे शिजत आहे. सरकारने आमच्यावर काठी उगारली, तर आम्हीही काठीचा बदला काठीने घेऊ. सरकार आमची मजा बघत असेल, तर मीही उपोषण सोडून व्यासपीठावर दगड-गोटे घेऊन बसेन,’’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी बुधवारी (ता. दोन) दिला.