बीड : ‘‘ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी साद घातल्यानंतर परळी वैजनाथ येथे गेलो आणि तेव्हा त्यांनी केलेल्या मागण्या सहाच दिवसांत पूर्ण झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोपींची नावे दिलेली आहेत..मुख्यमंत्री व पोलिस अधीक्षकांनी आरोपींना अटक करावी, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ, जिल्हा ‘बंद’ करू,’’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी दिला. ‘‘मेलो तरी चालेल, पण महादेव मुंडेंना न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही,’’ असेही ते म्हणाले..परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला २१ महिने लोटले तरी आरोपींना अटक होत नसल्याने जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे शुक्रवारी (ता. एक) सर्वधर्मीय, सर्वपक्षीय बैठक झाली. बैठकीला मोठ्या सभेचे स्वरूप आले. महादेव मुंडे यांचे वडील दत्तात्रय, आई चंद्रकला, पत्नी ज्ञानेश्वरी, मुले प्रवीण, पंकज आणि प्रणव मुंडे, मेहुणे सतीश फड यांच्यासह धनंजय देशमुख आदी व्यासपीठावर होते..‘‘परळीतील बहीण-भावाशी वैर नाही हे अगोदरच सांगितले होते. पण, विचित्र उद्योग करणाऱ्यांना सोडणार नाही. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटू नये म्हणून धनंजय मुंडे प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी सहा चकरा मारल्या,’’ असा आरोप जरांगेंनी केला. महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर मांस काढून त्याचा तुकडा दाखवला जातो, इतकी क्रूरता आली कुठून? यावेळी आई-बाप, पत्नीचे काळीज काय म्हणत असेल? परळीकरांनी दबून राहू नये. कोणीही आवाज दिला तर मदतीला धावा. आम्ही या टोळीला सोडणार नाही,’’ असा इशाराही त्यांनी दिला.मंत्रिपद जातीचे लोक मारण्यासाठी हवे.इकडे एका बहिणीचे कपाळ उघडे असताना तुम्ही मंत्रिपदासाठी प्रयत्न करता. मंत्रिपद जातीच्या विकासासाठी हवे असते तर आम्हाला आनंद झाला असता. मात्र, जातीचे लोक मारण्यासाठी, आरोपींना लपवण्यासाठी त्यांना मंत्रिपद हवे असल्याचा टोला मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांना लगावला. महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांना न भेटल्याबद्दल त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. .जरांगेंमुळे मुख्यमंत्र्यांची भेट ज्ञानेश्वरी मुंडे पतीच्या हत्येनंतर २१ महिन्यांच्या प्रवासात अनेक यातना भोगल्या. विष प्यावे लागले. विधिमंडळात चर्चा झाली तरी आपण हतबल होतो. मात्र, मनोज जरांगे पाटील यांना हाक दिली आणि त्यांनी केवळ तीन दिवसांत मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मिळवून दिल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या. .मुख्यमंत्र्यांचे आभार; मात्र त्यांनी कोणालाही पाठीशी न घालण्याचा दिलेला शब्द पाळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत मनोज जरांगे पाटील संघर्षयोद्धा नाही, तर समाजसुधारक असल्याचे त्या म्हणाल्या. कुटुंबीयांना हुंदके अनावर मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हजारोंच्या संख्येने समाजबांधव पाठीशी उभे राहिले, न्याय मिळण्याच्या दिशेने पडणारी पावले पाहून मुंडे कुटुंबीयांना हुंदके आवरता आले नाहीत..IND vs ENG 5th Test: इंग्लंडची 'ताकद' कमी झाली, प्रमुख जलदगती गोलंदाजाने माघार घेतली! भारताला विजयाची संधी.महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी, वडील दत्तात्रय, आई चंद्रकला आणि मुले प्रवीण, प्रणव आणि पंकज यांनी व्यासपीठावरच अश्रूंना वाट मोकळी करून दिली. खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार सय्यद सलीम, शिवसेनेचे अनिल जगताप, सचिन मुळूक, स्वप्निल गलधर, विजयसिंह बांगर, शिवराज बांगर, एमआयएमचे शेख शफिक, मीरा गित्ते, राजाभाऊ फड, धनंजय देशमुख आदी उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.