देगलूर - तालुक्यातील मौजे झरी येथील एका शेतकऱ्याची घरासमोरील प्लॉटमध्ये बांधलेली म्हैस ता. २४ एप्रिल २५ रोजी अज्ञातांनी चोरून नेली होती. याप्रकरणी शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मरखेल पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा उकल करण्यात मरखेल पोलिसांना यश आले असून या प्रकरणातील झरी येथील एका लोहा येथील इतर दोन आरोपींच्या मुसक्या मरखेल पोलिसांनी आवळलया आहेत.