agitation for maratha reservation
sakal
लातूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (ता. ३) 'लातूर जिल्हा बंद'चे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय बुधवारी (ता. २) लातूर येथे झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर समाजबांधवांनी दुचाकी फेरी काढून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांना अभिवादन केले. यावेळी रस्त्यावर ठिय्या देऊन समाजबांधवांनी आरक्षण समर्थनार्थ व सकारविरोधात घोषणाबाजी केली.