

manoj jarange
esakal
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. काल त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली. जालना पोलिसांनी हत्येचा कट रचणाऱ्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली असून, यात एका बड्या नेत्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. याबाबत जरांगे यांनी पत्रकार परिषदेत मोठा खुलासा केला.