
धाराशिव : मंत्री संजय शिरसाट एकीकडे मराठ्यांची मनधरणी करतात आणि दुसरीकडे प्रमाणपत्रे देऊ नका, असा संदेश अधिकाऱ्यांना देत आहेत, असे काही अधिकारीच बोलू लागले आहेत. त्यामुळे शिरसाट हे मराठा तरुणांचे वाटोळे करण्याचे काम करताय की काय? अशी शंका येऊ लागली आहे. हे प्रकार थांबवा, अन्यथा यापुढे राज्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयांना घेराव घालू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला.