Maratha Reservation : अर्धापुरात सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीच्या ठरावाच्या प्रतीची होळी, तिसऱ्या दिवशी जलभरो

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भात मुंबई येथे संपन्न झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत पारित झालेल्या ठरावाच्या प्रतींची होळी करून निषेध गुरुवारी (ता. दोन) करण्यात आला.
Ardhapur Maratha Reservation Agitation
Ardhapur Maratha Reservation Agitationsakal

अर्धापूर (जिल्हा नांदेड) - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भात मुंबई येथे संपन्न झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत पारित झालेल्या ठरावाच्या प्रतींची होळी करून निषेध गुरुवारी (ता. दोन) करण्यात आला. शासनाने मराठा समाजाला सरसगट ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सलग तिसऱ्या दिवशी जलभरो आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणी संदर्भात मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला सत्ताधारी व‌ विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांनी‌ ठराव पारित केला आहे. हा ठराव मनोज जरांगे-पाटील यांनी फेटाळला असून, मराठा समाजाला तातडीने ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे.

या सर्वपक्षीय नेत्यांनी पारित केलेल्या ठरावाचा निषेध करण्यासाठी शहरातील बसवेश्वर चौकात सकल मराठा समाजाचे तरूण, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने सकाळी एकत्र आले व सर्वपक्षीय नेत्यांनी पारित केलेल्या ठरावाच्या प्रतींची होळी करून निषेध व्यक्त केला. तसेच सर्व पक्षीय नेत्यांचा निषेध करत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत स्पष्ट भूमिका घेऊन ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

सकल मराठा समाजाच्या वतीने तालुक्यातील विविध गावांमध्ये उपोषण करण्यात येत आहे. तालूक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गण निहाय जलभरो आंदोलन करण्यात येत आहे. तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी जलभरो आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील शेकडो नागरिकांनी स्वतःला आटक करुन घेतली, व मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. पोलिस ठाण्याचा परिस घोषणांनी दणाणून गेला ‌.‌या जलभोरो आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com