Maratha Reservation : ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण हा आमचा हक्क : मनोज जरांगे पाटील

मराठा समाज एकसंघ झाला आहे. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. मराठा समाजाने आता बेसावध राहू नये. मराठा समाजाला चोही बाजूने घेरले जात आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsakal

उमरगा - मराठा समाज एकसंघ झाला आहे. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. मराठा समाजाने आता बेसावध राहू नये. मराठा समाजाला चोही बाजूने घेरले जात आहे. मराठा समाजाचा एकही राजकारणी मराठा आरक्षणा करिता पुढे येत नाही. ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण हा आमचा हक्क आहे, तो आम्ही मिळवणारच. असे मराठा संघर्ष यौद्धा मनोज जरांगे पाटील यांनी निर्धार केला.

कवठा (ता. उमरगा) येथे रविवारी (ता. १०) आयोजित सभेत जरांगे पाटील बोलत होते. मराठा बांधवांनी आरक्षणापासुन वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. आमच्या बापजाद्यांनी निमूठपणे ते सहन केले. लेकरांच्या शिक्षण, नौकरीचा विचार केला नाही. आता उशीरा सर्वांना याची झळ पोहचत आहे. लेकरांच्या उज्वल भविष्यासाठी मी आरक्षणासाठी लढत आहे. तो सुवर्ण क्षण लवकरच येणार आहे, त्याचे साक्षीदार आपण सर्वजण असू. असे जरांगे पाटील म्हणाले.

कवठेकरांनी केले जंगी स्वागत

टाळमृंदगाच्या गजरात 'गावाला आनंद झाला. आरक्षण मिळवून देण्या मराठा समाजाला... जरांगे पाटील आले कवठ्याला.... कवठा गावाची पुण्याई मोठी.....

या अंभग गायनातून व छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भेटीची मूर्ती भेट देऊन कवठा ग्रामस्थांनी जरांगे पाटील यांचे स्वागत केले. सभेत जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांच्या ऐक्याचे कौतुक करून अंतिम टप्यात आलेल्या आरक्षणाच्या लढ्यासाठी सतर्क रहाण्याचे आवाहन केले.

विठ्ठल रुक्मीणी महिला भजनी मंडळाचे शोभा सोनवणे, अलका माने, मंगल माने, संजना सोनवणे, तानाजी सोनवणे, राजेंद्र सोनवणे यांनी मराठा आरक्षणावरील गीतांचे सादरीकरण केले. यावेळी  एकोंडी, पेठसांगवी, मोगरगा, नारंगवाडी आदी सह परिसरातील भजनी मंडळाच्या दिंड्यानी अंभग गायनाने उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.

कवठा पाटी येथील भव्य स्वागत कमाणीत छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे छायाचित्र महाराष्ट्राच्या संस्काराच्या अध्यात्मीक संस्कृतीचे दर्शन देणारी ठरली होती. आई तुळजाभवानी श्री छत्रपती शिवाजी महाराजाना तलवार भेट  देत असतानाचे छायाचित्र हिंदवी स्वराज्याच्या रक्षणाचे साक्ष देत असल्याचे दिसून आले.

विनायकराव पाटील, भीमा सोनवणे, व्यकंटराव सोनवणे, विजयकुमार सोनवणे, अतुल सोनवणे, नितीन पाटील, विकास पाटील, अमित सोनवणे, मलंग गुरुजी यांच्यासह कवठा ग्रामस्थ, तरुण युवक मंडळ, महिला ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. कमलाकर भोसले यांनी सुत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com