Maratha Reservation : तर जीवंत समाधी घेणार ! शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी जाहिर केला निर्णय

" मराठा आरक्षणासंदर्भात राज्यकर्त्यांनी पोरकटपणा सुरू केला आहे
protest
protest sakal

उमरगा- प्रामाणिक आणि निस्वार्थ भावनेतुन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली नाही तर शुक्रवारी (ता. तीन) सायंकाळी जीवंत समाधी घेण्याचा कठोर निर्णय शेतकरी नेते, सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी घेतला आहे. श्री. पाटील यांनी कवठा गावात सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी (ता. ३०) पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहिर केला.

" मराठा आरक्षणासंदर्भात  राज्यकर्त्यांनी पोरकटपणा सुरू केला आहे. मुळात आरक्षणाचा मुद्दा राजकारणासाठी होऊ नये, गरिब, रोजीरोटीसाठी महाग झालेल्या आणि मुलांच्या शिक्षण, नोकरीसाठी मराठा समाजाला आरक्षण हवं आहे. कुणबी प्रमाणपत्राचा निकष फक्त पुरावा असणाऱ्यांनाचा नको, तर तो सरसकट दिला गेला पाहिजे. असे श्री. पाटील यांनी या वेळी सांगितले. माजी सरपंच विकास पाटील, व्यंकटराव सोनवणे, धर्मा सोनवणे, मलंग गुरूजी यांच्यासह ग्रामस्थ व महिला या वेळी उपस्थित होत्या.

जात, धर्मात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न !

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी हा आमचा "डीएनए" असल्याचे वक्तव्य करुन जाती, जातीत द्वेष पसरवण्याचे पाप करताहेत. त्यांना मुळात मराठा समाजाबद्दल आस्था नाही, असा आरोप करून श्री. पाटील यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टिका केली, ज्यांनी भ्रष्टाचार लपवण्यासाठी चुलत्याशी बेईमानी केली, त्यांच्याकडुन मराठा समाजाशी इमानदारी राहिल का ? असा टोला लगावला.

protest
Maratha Reservation : सरकारवर दबाव! तीव्र लढा, प्रकृतीची चिंता... लक्ष्य मात्र आरक्षण

तर जीवंत समाधी घेणार !

मनोज जरांगे पाटील आमचा आत्मा आहे, अखंड उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे, ते मला सहन होत नाही. शुक्रवारी दुपारपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय जाहिर करावा, अन्यथा सांयकाळी जीवंत समाधी घेणार आहे. तीन दिवसापासुन पाणी घेतले नाही, आणि घेणारही नाही. प्रशासनाने जबरदस्ती करुन मला उपोषणापासुन परावृत्त करु नये असे श्री. पाटील यांनी सांगितले.

protest
Maratha Reservation: सरकारला माझ्या भावाला सिरियस करायचंय, पण.. ; जरांगेंच्या भेटीला आलेल्या आरोग्यसेविकेला रडू कोसळलं

४६ गावात आजी, माजी मंत्री, आमदार खासदारांना प्रवेश बंद

तुरोरी, मुरूम, वागदरी, कोराळ, नाईचाकुर, कवठा, नारंगवाडी तलमोड, कदेर, गुंजोटी, मातोळा, गुगळगाव, तुगांव, चिंचोली (ज.), मुळज, जकेकुर, बाबळसुर, जकेकुरवाडी, महालिंगरायवाडी

पळसगाव, बेडगा, नागराळ

भिकार सांगवी, पेठसांगवी, एकोंडी (ज.), दाबका, मानेगोपाळ, बलसूर, त्रिकोळी, मळगी, मळगीवाडी, कोरेगांव,  जगदाळवाडी, हिप्परगाराव, एकूरगा, माडज, कंटेकूर, कराळी, रामपूर, समुद्राळ, चिंचोली (भुयार), औराद, पारसखेडा, चंडकाळ, गुरुवाडी या ४६ गावात आजी, माजी मंत्री, आमदार खासदारांना मराठा बांधवानी प्रवेश बंद केला आहे. दरम्यान उमरग्यातील साखळी उपोषणाच्या सहाव्या दिवशीही आंदोलनाची आक्रमकता कायम होती.

protest
Maratha Reservation : अजित पवारांचे दोन शिलेदार देणार राजीनामा? मराठा आरक्षण आंदोलन पेटलं

आण्णासाहेब पवार यांचे दुसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरु होते. सोमवारी तुरोरी, दगडधानोरा, मळगी, मळगीवाडी, गुरूवाडी, आष्टा (जहागीर), हिप्परगाराव, दोन कोळसूर (गुंजोटी), कोळसूर (कल्याणी), चिंचकोट, कराळी, मुळज, दाबका येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषणस्थळी दाखल झाले होते. दरम्यान कदेर, कोराळ, मुरुम, गुंजोटी येथेही उपोषण सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com