Maratha Reservation : उपोषणावर तोडगा निघेणा, सहाव्या दिवशी हि जरांगे उपोषणावर ठाम

अंतरवाली सराटी येथे शासनाचे प्रतिनिधी यांनी गुरूवार ता. 15 रोजी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली.
Manoj Jarnage Patil
Manoj Jarnage PatilSakal

वडीगोद्री - अंतरवाली सराटी येथे शासनाचे प्रतिनिधी यांनी गुरूवार ता. 15 रोजी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. चर्चात प्रतिनिधी यांना जोपर्यत अधिवेशन घेऊन कायदा पास होत नाही, गुन्हे वापस घेतले जात नाही तो पर्यत उपोषण सुरूच ठेवणार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

या वेळी शासन प्रतिनिधी यांना जरांगे यांनी विचारले ते म्हणाले, अंमलबजावणी करणार का, विस तारखेला अधिवेशन कशासाठी आहे, गुन्हे वापस घेण्याबाबत काय झाले, हैदराबादचे गॅजेट स्विकारले का, शिंदे समीतीला मुदतवाढ दिली का, मागासवर्ग अयोगाचा अहवाल स्विकारला का, असे प्रश्न जरांगे यांनी केला.

शासनाकडून लेखी आणले का, लेखी नाही तर कशाला आले, असे मनोज जरांगे यांनी भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळाला दिले. मी उपोषणावर ठाम आहे, वैघकिय उपचार घेणार नाही, असे सांगीतले. शासन विस तारखेला अधिवेशन घेणार आहे, गुन्हे वापस घेण्याबाबत शिफारस झाली आहे, समीती काम करत आहे, असे शासन प्रतिनिधी मोडी लिपी तज्ञ संतोष यादव यांनी सांगितले.

यावर जरांगे यांचे समाधान झाले नाही, या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी मोडी लिपी तज्ञ संतोष यादव, अंबड उपविभागीय अधिकारी महसुल दिपक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, आदी शासनाचे प्रतिनिधी यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली व चर्चा केली.

सचिव सुमंत भांगे, मुख्यमंत्री शिंदे यांच्या सहीचा मागणी मान्य केल्याचे पत्र, अध्यादेश घेऊन या, लेखी नसेल तर कशाला आले, गॅजेट स्विकारले का नाही? असे प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केले. निर्णय होत नाही तोपर्यत लढा सुरूच राहणार असे जरांगे यांनी सांगितले.

गुरुवार ता.15 रोजी मनोज जरांगे यांचे 6 व्या दिवशी हि उपोषण सुरूच आहे. अन्न, पाणी, व वैघकिय उपचार घेण्यासाठी आजही नकार दिला आहे. त्यांची तब्येत खालावली आहे. जरांगे यांना उठता, बसता येत नाही, पोटात दुखत आहे, काल नाकातुन रक्तस्त्राव झाला होता तरही ते उपोषणावर ठाम आहेत.

गुरूवार ता.15 रोजी छत्रपती संभाजीनगर -बीड रोडवर अर्धा तास रस्ता रोको करण्यात आला. नारायण गडाचे मंहत शिवाजी महाराज, बंकट स्वामी संस्थान नेकनूर येथील मंहत आदी हे दुपारी अंतरवाली सरटी येथे आले आसता त्यांनी व उपस्थित महीला, नागरीक यांनी जरांगे यांना पाणी घेण्यासाठी आग्रह केला त्यांचा मान राखत जरांगे यांनी पाणी घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com