Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचा हजारो वाहनांसह ताफा मुंबईकडे रवाना
Maratha Reservation March: मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा हजारो वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे. सगेसोयरे अद्यादेशाची अंमलबजावणी व ओबीसीमधून आरक्षणाची मागणी यासाठी हे आंदोलन सुरू झाले आहे.
जालना : मराठा आणि कुणबी एकच आहेत, सगेसोयरे अद्यादेशाची अंमलबजावणी करत, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या हजारो वाहनांसह अंतरवली साराटी येथून मुबईंकडे निघाले आहेत.