
बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या आठवड्यात गुरुवार (ता. २९) पासून मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यातील चारशे गावांमध्ये चावडी बैठका झाल्या, तर रविवारी (ता. २४) मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत अंतिम इशारा सभा होत आहे.