मराठा आरक्षणाचे लाभ पूर्ववत चालू ठेवा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दीपक सोळंके
Monday, 14 September 2020

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास दिलेल्या स्थगितीचे परिणाम होऊ नये म्हणून राज्य सरकारने तत्काळ विशेष अध्यादेश काढुन मराठा आरक्षणाचे लाभ पूर्ववत चालु ठेवावे, अशी मागणी सकल मराठा समाज तालुका समन्वयक समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

भोकरदन (जि.जालना) : सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणास दिलेल्या स्थगितीचे परिणाम होऊ नये म्हणून राज्य सरकारने तत्काळ विशेष अध्यादेश काढुन मराठा आरक्षणाचे लाभ पूर्ववत चालु ठेवा, अशी मागणी सकल मराठा समाज तालुका समन्वयक समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. समन्वयक समितीच्या वतीने सोमवारी (ता.१४) उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यामार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

औरंगाबादेत कोरोनामुळे पत्रकार राहुल डोलारे यांचा मृत्यू

निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाजातील विद्यार्थी व पालकांचे मनोधैर्य खचले आहे. विशेषतः वैद्यकीय परीक्षा तोंडावर असतांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक आहे. परिणामी समाजातील विद्यार्थी व पालकांमध्ये शैक्षणिक धोका निर्माण झाल्याची भावना आहे.

अचानक उद्धभवलेल्या परिस्थितीमुळे गरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशात बाधा येणार नाही. तसेच मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत सरकारने सर्व भरती प्रक्रियाही थांबबावी. मराठा समाजातील युवक आक्रमक होण्याआधी सरकारने मराठा आरक्षण संदर्भात तत्काळ निर्णय घेऊन विद्यार्थी व युवकांना मानसिक आधार द्यावा नसता पुढील काळात सकल मराठा समाज रत्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाचे अस्तित्वच धोक्यात, परवाना...

या निवेदनावर प्रा. नंदकुमार गिरे, प्रा.अंकुश जाधव, सुरेश तळेकर, सतीश रोकडे, विष्णू गाढे, विनोद मिरकर, अप्पासाहेब जाधव, नारायण जिवरग, डॉ.चंद्रकांत साबळे, राहुल देशमुख, सोपान सपकाळ, शिवाजी सपकाळ, बबन जंजाळ, बबन शिंदे, दीपक मोरे, दीपक जाधव, विकास बोर्डे, भगवान पालकर, सुर्यकांत पाटील, भगवान गिरणारे, गजानन नागवे, सुरेश बनकर, राजु सहाणे, अमोल शिंदे, समिर जाधव, वामन जंजाळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Reservation Status Continue As It, Demands To Chief Minister