मराठा आरक्षण : परभणीत जोरदार रस्तारोको

गणेश पांडे
Wednesday, 9 December 2020

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजु मांडण्यात कमी पडत असल्याचा आरोप करीत मराठा क्रांती मोर्चाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता.नऊ) दुपारी पाथरी रस्त्यावरील विसावा कॉर्नर येथे रास्तारोको आंदोलन केले.

परभणी ः मराठा आरक्षण टिकविण्या सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या काढून घ्याव्यात. आमदार - खासदारसह मंत्र्यांना रस्त्याने फिरू देऊ नका असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला. बुधवारी (ता.नऊ) आरक्षणाच्या मागणीसाठी पाथरी रस्त्यावर अर्धातास रस्तारोको करण्यात आला.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजु मांडण्यात कमी पडत असल्याचा आरोप करीत मराठा क्रांती मोर्चाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता.नऊ) दुपारी पाथरी रस्त्यावरील विसावा कॉर्नर येथे रास्तारोको आंदोलन केले. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. पुढील सुनावणी ता. 25 जानेवारीत होईल, असे म्हटले. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या पॅनलमधील वकीलांसह सरकारही सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडल्याचा गंभीर आरोप करीत तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या. विशेषतः या संतप्त कार्यकर्त्यांनी जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्ऩरवर रास्तारोको आंदोलन सुरू केले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. या आंदोलनात सुभाष जावळे, किशोर रणेर, अरुण पवार  विठ्ठल तळेकर, गजानन लव्हाळे,  विजय जाधव, रवि घायाळ,नितीन लोहट , ज्ञानेश्वर खटिंग  यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा -  नांदेडात खळबळ : कारागृह अधीक्षकांनाच शिविगाळ, मारहाण, तुरुंगाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल -

बारा कार्यकर्त्यांना अटक व सुटका

आरक्षणाची स्थगिती उठविण्यास सर्वोच्य न्यायालयाने नकार दिल्याने संतप्त झालेल्या सकल मराठा समाजातील नागरीकांनी बुधवारी रस्ता रोको केला. यावेळी आंदोलनात सहभागी 10 ते 12 कार्यकर्त्यांना नानलपेठ पोलिसांनी अटक केली. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

मराठा आरक्षणा संदर्भात महाविकास आघाडीचे सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारमधील नेत्यांच्या खुर्च्या काढून घ्याव्या लागतील. तातडीने समन्वय साधून यात उपाय योजना कराव्यात अन्य़था राज्यातील आमदार - खासदारांसह मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत.

- सुभाष जावळे, सकल मराठा समाज, परभणी

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Reservation: Strong roadblocks in Parbhani