Maratha Reservation Survey : मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी हवेत आठ दिवस ; एकाचवेळी सर्वेक्षणाची माहिती भरण्यात येत असल्याने तांत्रिक अडचणी

मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी प्रगणकांना सुरवातीला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यात सर्वेक्षण ॲपमध्ये कळंब हे दोन दिवस दिसले नाही.
dharashiv
dharashivsakal
Updated on

कळंब : मराठा आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्वेक्षणासाठी प्रगणकांना सुरवातीला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यात सर्वेक्षण ॲपमध्ये कळंब हे दोन दिवस दिसले नाही. तालुक्यातील मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातही सर्वेक्षणाच्या कामाला अडचणी आल्या. त्यामुळे सर्वेक्षणासाठी किमान आठ दिवसांची मुदतवाढ मिळणे अपेक्षित होते मात्र, आयोगाकडून केवळ दोन दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे.

मराठा मागासलेपण तपासण्यासाठी २३ जानेवारीपासून तालुक्यात मराठा समाज, खुल्या प्रवर्गाची सर्वेक्षण घरोघरी जाऊन केले जात आहे. हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सुरवातीचे दोन-तीन दिवस सर्वेक्षणाला असंख्य अडचणी आल्या होत्या. एकाचवेळी सर्वेक्षणाची माहिती भरण्यात येत असल्याने तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाईल बॅटरी डिस्चार्ज होणे आदी संकट आले. सर्वेक्षणाचे काम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होणे शक्य नसल्याने दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. कमीत कमी आठ दिवसाची मुदत वाढ मिळणे, अपेक्षित असल्याचे मत प्रगणकाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

dharashiv
Dharashiv News : कळंबच्या भूमिपुत्राचे गेट्स ऑफ हेवनमध्ये यश ; सूरज मुंढे यांनी ८९ तास ४५ मिनिटांत कापले १,२०० कि.मी. अंतर

मराठा समाजाचे मागासलेपण जाणून घेण्यासाठी हाती घेतलेल्या सर्वेक्षणाच्या कामासाठी आणखी आठ दिवस वाढवून मिळणे अपेक्षित आहे. दरम्यान, आत्तापर्यंत तालुक्यात ९० टक्के काम झाल्याची माहिती असून राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार २३ जानेवारीपासून पालिका हद्दीत मराठा समाजाचे मागासलेपण जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी ८० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पालिकेच्या हद्दीत कुटुंबांचा सर्व्हे सुरू आहे. परंतु, सर्वेक्षण ॲपमध्ये दोन दिवस कळंब दिसून आले नसल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ वाढली आहे.

या सर्वेक्षणाची मुदत ३१ जानेवारीपर्यंत असल्याने व आणखीन दोन दिवसाची मुदतवाढ मिळाल्याने दोन दिवसात मिळकतींचा सर्व्हे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे उर्वरित कामासाठी आठ दिवस मुदतवाढ मिळावी, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कळंब तालुक्यात ९० टक्के काम पूर्ण

तालुक्यातील शहरासह ९७ गावामध्ये सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रत्येक घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट असून ९० टक्के सर्वेक्षणाचे काम झाले आहे. दुसरीकडे दोन दिवसांची मुदतवाढ मिळाल्यामुळे उर्वरित शिल्लक असलेले सर्वेक्षणाचे काम पूर्ण करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com