
Maratha Reservation: मुंबईच्या आझाद मैदनातील उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजी नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. गुरुवारी रात्री मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंची रुग्णालात भेट घेतली. यावेळी अभ्यासकांशी चर्चा करुन प्रमाणपत्र वाटप प्रक्रिया सुलभ करण्याचा शब्द दिला.