

Chal Re Bhopalya Marathi children's play applauded at Hyderabad International Theatre Festival by Dr Prithviraj Taur
Sakal
नवीन नांदेड : पारंपरिक लोककथेचा आधुनिक रंगमंचावरील आविष्कार आणि चिमुकल्या कलावंतांचा बहारदार अभिनय... या जोरावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांनी पुनर्रचित केलेल्या 'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक' या पारंपरिक लोककथेच्या नाट्यरूपांतराचा प्रयोग हैदराबाद येथे आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात 'रंगधारा'च्यावतीने सादर करण्यात आला. देशविदेशातील विविध बालनाट्यांसमवेत 'चल रे भोपळ्या'च्या मराठी भाषेतील प्रयोगाने हैदराबादकरांची मने जिंकली. अप्रतिम प्रयोग अशा शब्दात गौरव करत प्रेक्षकांनी बालकलावंतांचे कौतुक केले.